महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३३० :
विधानमंडळापुढे नियम ठेवणे :
या संहितेअन्वये केलेला प्रत्येक नियम हा, तो करण्यात आल्यानंतर, शक्य असेल तितक्या लवकर राज्य विधानमंडळाचे अधिवेशन चालू असताना, एकाच अधिवेशनात किंवा लागोपाठच्या दोन अधिवेशनात, एकूण तीस दिवसांची होईल इतक्या मुदतीकरिता, प्रत्येक समागृहापुढे ठेवण्यात येईल ; आणि ज्या अधिवेशनात तो असा रीतीने देण्यात आला असेल ते अधिवेशन किंवा लागोपाठच्या दोन अधिवेशनात एकूण तीस दिवसांची होईल इतक्या मुदतीकरिता प्रत्येक समागृहापुढे ठेवण्यात येईल; आणि ज्या अधिवेशनात तो असा रीतीने ठेवण्यात आला असेल ते अधिवेशन किंवा त्याच्या लगतनंतरचे अधिवेशन समाप्त होण्यापूर्वी, त्या नियमात कोणताही फेरफार करण्यास दोन्ही सभागृहे कबूल होतील किंवा तो नियम करण्यात येऊ नये म्हणून दोन्ही सभागृहे कबूल होतील, आणि राजपत्रात असा निर्णय अधिसूचित केला असेल तर तो नियम अधिसूचनेच्या प्रसिध्दीच्या दिनांकापासून केवळ अशा सुधारलेल्या स्वरूपात अंमलात येईल किंवा यथास्थिति, तो अमंलात येणार नाही; तथापि, असा कोणताही फेरफार किंवा रद्द करणे यामुळे उक्त नियमान्वये पूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या कोणत्याही गोष्टींच्या कायदेशीरपणास बाध येणार नाही.
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.