महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३३०-क :
१(अधिकारांचे व कर्तव्यांचे प्रत्यायोजन :
या संहितेत विवक्षितरीत्या तरतुद करण्यात आली असेल त्यांव्यतिरिक्त, राज्य शासनास व राज्य शासनाच्या मान्यतेस अधीन राहून, कोणत्याही आयुक्तास किंवा जिल्हाधिकाऱ्यास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असा निदेश देता येईल की, या संहितेद्वारे किंवा तद्न्वये त्यास प्रदान करण्यात आलेले सर्व किंवा कोणतेही अधिकार व त्याच्यावर लादण्यात आलेली कर्तव्ये, अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील असा निर्बंधांच्या व शर्तींच्या, तशा शर्तीं असल्यास, अधीन राहून, विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल असा अधिकाऱ्यास सुध्दा वापरता येतील व पार पाडता येतील.)
------------
१.सन १९७० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४ याच्या कलम ७ द्वारे कलम ३३०-क समाविष्ट करण्यात आले.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३३०-क
#MLRCAct1966Marathisection330A #section330aMLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.