महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६
कलम १४ :
नियम करण्याचा अधिकार :
(१) राज्य शासनास, या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नियम करता येतील.
(२) या अधिनियमान्वये करण्यात आलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाचे अधिवेशन चालू असताना, एकाच अधिवेशनात किंवा लागोपाठच्या दोन किंवा अधिक अधिवेशनात मिळून एकूण तीस दिवसांचे होईल इतक्या मुदतीकरिता, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल, आणि ज्या अधिवेशनात किंवा अधिवेशनांमध्ये तो अशा रीतीने ठेवण्यात आला असेल ते अधिवेशन किंवा त्याच्या लगतनंतरचे अधिवेशन किंवा अधिवेशने समाप्त होण्यापूर्वी, कोणत्याही नियमात कोणताही फेरबदल करण्याबाबत दोन्ही सभागृहांचे एकमत झाले किंवा नियम करू नये म्हणून दोन्ही सभागृहांचे एकमत झाले आणि त्यांनी तशा आशयाचा निर्णय राजपत्रात अधिसूचित केला तर, तो नियम, अशा निर्णयाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून केवळ अशा फेरबदल केलेल्या स्वरूपात अंमलात येईल, किंवा, यथास्थिति, तो मुळीच अंमलात येणार नाही; तथापि, असा कोणताही फेरबदल किंवा विलोपन यामुळे त्या नियमान्वये पूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या कोणत्याही गोष्टीच्या वैधतेस बाध येणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.