भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८
कलम २३ :
कलम १३(१)(क) याखालील, अपराधांच्या संबंधातील आरोपांचा तपशील :
फौजदारी प्रक्रिया, संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, जेव्हा कलम १३ च्या पोटकलम, (१)खंड (क) अन्वये आरोपीवर अपराधविषयक आरोप ठेवण्यात येत असेल तेव्हा, अशा आरोपपत्रामध्ये, ज्या मालमत्तेसंबंधी अपराध केल्याचे अभिकथित असेल अशा मालमत्तेचे आणि ज्या तारखांच्या दरम्यान अपराध घडला असण्याचे अभिकथित असेल अशा मालमत्तेच्या विशिष्ट बाबी किंवा सदर संहितेच्या कलम २१९ च्या अर्थांतर्गत, अशा प्रकारे ठेवण्यात आलेला आरोप ही एकाच अपराधाचा आरोप असल्याचे मानण्यात येईल :
परंतु, अशा तारखांपैकी पहिली व शेवटची तारीख यामध्ये एक वर्षापेक्षा अधिक कालावधी असणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.