रेल्वे अधिनियम, १९८९
कलम २०० :
निरसन व व्यावृत्ती :
१) भारतीय रेल्वे अधिनियम, १८९० (१८९० चा ९) याद्वारे निरसित करण्यात येत आहे.
२) भारतीय रेल्वे अधिनियम, १८९० (१८९० चा ९) (यात यापुढे निरसित अधिनियम असे उल्लेखिलेला) निरसित करण्यात आला असला तरीही, -
क) निरसित अधिनियमान्वये केलेले किंवा करण्याचा उद्देश असलेले काहीही किंवा केलेली किंवा करण्याचा उद्देश असलेली कोणतीही कारवाई (केलेला किंवा काढलेले कोणतेही नियम, अधिसूचना, तपासणी, आदेश किंवा नोटीस अथवा केलेली कोणतीही नियुक्ती किंवा घोषणा, किंवा देण्यात आलेले कोणतेही लायसन, अनुज्ञा, प्राधिकार, किंवा सूट, अथवा निष्पादित केलेला कोणताही दस्तऐवज किंवा संलेख अथवा दिलेला कोणताही निदेश किंवा केलेली कोणतीही कार्यवाही किंवा बसवलेली कोणतीही शास्ती वा द्रव्यदंड यांचाही यात समावेश होतो) ती या अधिनियामच्या उपबंधांशी विसंगत नसेल तेथपर्यंत, या अधिनियमाच्या तदनुरुप उपबंधान्वये करण्यात आल्याचे मानण्यात येईल.
ख) निरसित अधिनियमाच्या कलम ४१ च्या पोटकलम (१) अन्वये रेल्वे दर अधिकरणाकडे केलेली, परंतु या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी निकालात न काढलेली कोणतीही तक्रार किंवा निरसित अधिनियमान्वये रेल्वे प्रशासनाची कोणतीही कृती वा अकृती याबद्दल उक्त अधिकरणाकडे करता येईल अशा कोणत्याही तक्रारीची, या अधिनियमाच्या प्रकरण सातवे याच्या उपबंधानुसार या अधिनियमन्वये घटित झालेल्या कोणत्याही, अधिकरणाकडून सुनावरी केली जाईल व त्यावर निर्णय घेतला जाईल.
३) पोटकलम (२) मधील विशिष्ट बाबींचा उल्लेख निरसनाच्या परिणामासंबंधात, सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, १८९७ (१८९७ चा १०) चे कलम ६ सर्वसाधारणत: लागू करण्यावर, बाधक किंवा परिणामक होईल, असे मानले जाणार नाही.
#Railway #Act 1989 #Marathi Section 200
Section 200 Railway Act 1989 in Marathi.
INSTALL Android APP
For Full Access Purchase Paid MemberShip : Price -150 / Yearly.
संपूर्ण अॅक्सेस साठी पेड मेंबर व्हा.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.