महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९
कलम १४१
जादा पोलिसांची नेमणूक करणे :
१) कलम ६५, ६६, ६६ अ, ६७, ६७-१अ, ६७-क, ६८, ६९ व ७० याखालील कोणताही अपराध करण्याशी किंवा तो करण्यास प्रोत्साहन देण्याशी कोणत्याही क्षेत्रातील रहिवाशांचा संबंध आहे अशी राज्य शासनाची खात्री झाल्यास त्यास शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारा योग्य वाटेल अशा मुदतीपर्यंत त्या क्षेत्रात जादा पोलीस नेमण्यात यावेत असा निदेश देता येईल.
२) अशा जादा पोलिसांचा खर्च राज्यशासनाने तसा निदेश दिल्यास, सर्वस्वी किंवा अंशत: खाली नमूद केलेल्या व्यक्तीवर कर बसवून किंवा अशा व्यक्तीच्या मालमत्तेवर पट्टी आकारून किंवा असा कर किंवा पट्टी ही दोन्ही बसवून व आकारून बसविण्यात आला पाहिजे. असा कर किंवा पट्टी :
अ) अशी अधिसूचना ज्या स्थानिक क्षेत्रांस लागू आहे त्या क्षेत्रांतील रहिवासी असलेल्या सामान्यत: सर्व व्यक्तीवर अथवा
ब) विशेषत: अशा व्यक्तींच्या आकारण्यात आला पाहिजे आणि राज्य शासनास असा कर किंवा अशी पट्टी ज्या प्रमाणात आकारली जाईल ते प्रमाण ठरविण्याविषयी निदेश देता येईल.
स्पष्टीकरण - ह्या कलमाच्या प्रयोजनाकरिता ‘रहिवासीङ्क या संज्ञेत अशा क्षेत्रात ज्या व्यक्ती स्वत: किंवा आपल्या अभिकत्र्यांमार्फत किंवा नोकरांमार्फत जमिनीचा किंवा इतर स्थावर मालमत्तेचा भोगवटा करतात किंवा ती धारण करतात त्या व्यक्तींचा समावेश होतो. तसेच तीत, ते जमीन मालक अशा क्षेत्रात प्रत्यक्ष रयतेकडून किंवा जमिनीचा भोगवटा करणऱ्या व्यक्तीकडून स्वत: किंवा आपल्या अभिकत्र्यामार्फत किंवा नोकरांमार्फत खंड किंवा महसूल वसूल करतात त्यांचा समावेश होतो. मग असे जमीन मालक अशा क्षेत्रात प्रत्यक्ष राहत नसले तरी हरकत नाही.
३) राज्य शासनास असा कर किंवा पट्टी देण्याची मुदत अशा जादा पोलिसांची ज्या मुदतीकरिता प्रत्यक्ष नेमणूक झाली असेल त्या मुदतीपलीकडे कोणत्याही बाबतीत पच वर्षांपेक्षा अधिक नसेल अशा मुदतीपर्यंत वाढविता येईल व राज्य शासनाने तसे करणे हे कायदेशीर असेल.
४) मुंबई पोलीस अधिनियम १९५१, कलम ५० पोट-कलम (४) ते (७) याच्या तरतुदी योग्य त्या फेरफारासह असा कर किंवा पट्टी वसूल करण्याच्या बाबतीत लागू होतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.