महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९
कलम १४०
सार्वजनिक जागी मादक द्रव्ये वगैरे यांचे सेवन करणे किंवा ती वापरणे यांस मनाई करण्याचा, त्यांचे नियमन करण्याचा किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचा राज्य शासनाचा अधिकार :
राज्य शासनास सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे कोणत्याही सार्वजनिक जागेत कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग सेवन करणे किंवा वापरणे यांस अशा आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तीस अधीन ठेवून मनाई करता येईल, त्याचे नियमन करता येईल किंवा त्यावर नियंत्रण ठेवता येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.