महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९
कलम ८८
खोटी चिकित्सापत्रे दिल्याबद्दल शिक्षा :
एखादा नोंदलेला वैद्यक व्यवसायी एखाद्या व्यक्तीस चिकित्सापात्र देईल व अशा व्यक्तीने ह्या अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा तदन्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा विनियमाचे किंवा तदन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अथवा ह्या अधिनियमान्वये दिलेल्या कोणत्याही लायसन्सचे, परवान्याचे, पासाचे किंवा प्राधिकारपत्राचे उल्लंघन करून, दारू, मादक द्रव्य किंवा अफू यांचे सेवन करण्यसाठी असे चिकित्सापत्र वापरावे असा त्या व्यवसायीचा इरादा असल्यास, त्यास, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कैदेची शिक्षा होईल किंवा (दहा हजार रूपयांपर्यंत) असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.