अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५
कलम ६-ड :
१.(विवक्षित प्रकरणी अधिकारितेला आडकाठी :
जेव्हा केव्हा एखादी अत्यावश्यक वस्तू तिच्यासंबंधात कलम ३ खाली काढण्यात आलेल्या आदेशाला अनुसरुन अभिग्रहण करण्यात आली असेल किंवा ज्यात अशी अत्यावश्यक वस्तू आढळली असेलअसे कोणतेही पुडके, पाकीट किंवा पात्र किंवा अशी अत्यावश्यक वस्तू वाहून नेण्यासाठी वापरलेला कोणताही प्राणी, वाहन, जहाज किंवा अन्य वाहन याचे कलम ६-क खाली अधिहरण होई तोपर्यंत अभिग्रहण करण्यात आले असेल तेव्हा अशा अत्यावश्यक वस्तूचा, पुडक्याचा, पकिटाचा, पात्राचा, प्राण्याचा, वाहनाचा, जहाजाचा किंवा अन्य वाहनाचा कब्जा, सुपूर्दगी, विल्हेवाट किंवा वितरण यासंबंधी आदेश काढण्याची अधिकारिता जिल्हाधिकाऱ्याला किंवा, प्रकरणपरत्वे, कलम ६-ग अन्वये संबंधित राज्य शासनाला असेल आणि त्या त्या काळी अंमलात आलेल्या अन्य कोणत्याही कायद्यात विरुद्ध असे काहीही अंतर्भूत असले तरी, कोणतेही न्यायालय, अधिकरण किंवा अन्य प्राधिकरण यांना ती अधिकारिता असणार नाही.)
----------
१. १९८६ चा अधिनियम ४२, कलम ६-ड ऐवजी हे कलम दाखल केले.
#EssentialCommoditiesAct1955Marathi #ECAActmarathisection6e #अत्यावश्यकवस्तुअधिनियम१९५५कलम६-ड
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.