महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९
कलम २२ :
कलम ३ खालील अपराधाच्या विषयातील गृहीतक :
१)कलम ३ खालील शिक्षापात्र असलेल्या संघटित गुन्हेगारी अपराधाच्या खटल्यामध्ये,-
क)आरोपीकडून, बेकायदेशीर शस्त्र आणि दस्तऐवज किंवा कागदपत्रांसह इतर साहित्या प्राप्त झाले आणि असा अपराध करताना, अशा बेकायदेशीर शस्त्रांचा आणि साहित्या व दस्तऐवज किंवा कागदपत्रांसह इतर साहित्याचा, वापर करण्यात आला असे मानण्यास संयुक्तिक कारण आहे, असे सिद्ध झाले तर; किंवा
ख)तज्ञांच्या पुराव्याद्वारे, आरोपीच्या बोटांचे ठसे अपराधाच्या जागेवर किंवा असा अपराध करण्याच्या संबंधात वापरण्यात आलेल्या बेकायदेशीर शस्त्रांवर किंवा इतर साहित्य आणि दस्तऐवज अथवा कागदपत्रे व वाहने यांसह कशावरही आढळून आल्याचे सिद्ध झाले तर,
विशेष न्यायालय, याविरुद्ध काही सिद्ध होईपर्यंत, त्या आरोपीनेच असा अपराध केल्याचे गृहीत धरील.
२)कलम ३ च्या पोटकलम (२) खाली शिक्षापात्र असलेल्या संघटित गुन्हेगारीचय अपराधाच्या खटल्यामध्ये आरोपी, संघटित गुन्हेगारीच्या अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तिस किंवा तसा वाजवी संशय असणाऱ्या व्यक्तिस वित्तीय सहाय्य देतो असे सिद्ध झाले तर, याविरुद्ध काही सिद्ध होईपर्यंत, विशेष न्यायालय, उक्त पोटकलम (२) खालील अपराध अशा व्यक्तिने केल्याचे गृहीत धरील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.