महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ११७ :
अकृषिक आकारणी देण्यापासून सूट मिळालेल्या जमिनी :
पुढील प्रयोजनांसाठी वापरण्यात आलेल्या जमिनीस अकृषिक आकारणी देण्यापासून सूट देण्यात येईल, ती प्रयोजने अशी :-
१)हातमागासाठी छपऱ्या उभारणे, कुक्कुटपालन व्यवसाय किंवा बागबगीचा तयार करणे यासारख्या शेतीस दुय्यम किंवा सहायक असलेल्या व्यवसायासाठी किंवा राज्य शासन त्यासंबंधात केलेल्या नियमात निर्दिेष्ट करील अशा इतर व्यवसायांसाठी शेतकऱ्याकडून वापरण्यात येणाऱ्या जमिनी;
२)मृतांची व्यवस्था लावण्याशी संबंधित असलेल्या प्रयोजनांसाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनी ;
३)सार्वजनिक पूजेअर्चेसाठीच केवळ भोगवटयात असलेल्या आणि वापरात येत असलेल्या आणि या संहितेच्या प्रारंभीपूर्वी रूढीने,मंजुरीने किंवा इतर कारणांमुळे जमीन महसुल देण्यापासून सूट असलेल्या जमिनी;
४)ज्या शैक्षणिक किंवा धर्मादाय प्रयोजनाचा लाभ धर्म, वंश, जात, जन्मस्थान किंवा यापैकी कोणत्याही गोष्टींचा आधार न घेता सर्व नागरिकांस मिळत असेल अशा, शैक्षणिक किंवा धर्मादाय प्रयोजनांसाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनी ;
५)राज्य शासन या संहितेअन्वये केलेल्या नियमांन्वये त्यात निर्दिष्ट करण्यात आले असेल अशा मुदतीसाठी व अशा शर्तीना अधीन राहून, ज्या कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनींना जमीन महसुलापासून सूट देईल अशा इतर कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरण्या येणाऱ्या जमिनी;
१.(५क) कलम ४२ च्या पोट-कलम २ अन्वये नगरेतर क्षेत्रातील वैयक्तिक खऱ्याखुऱ्या निवासी प्रयोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या सेवाजमिनी )
६)निवासी इमारतीच्या प्रयोजनांसाठी म्हणून नागरीतर क्षेत्रातील (गावठाण असल्यास त्याबाहेरील ) ज्या शेतजमिनीचे अकृषक वापरात परिवर्तन करण्यात आले असेल. अशा राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे निर्दिष्ट करील अशा शेतजमिनी;
----------
१.सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १७, याच्या कलम ४ अन्वये (क) हे पोट-कलम दाखल करण्यात आले.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम११७
#MLRCAct1966Marathisection117 #section117MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.