महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ११८ :
सूट रद्द करणे :
कलम ११७ च्या तरतुदींअन्वये ज्या जमिनीस अकृषिक आकारणी देण्यापासून सूट देण्यात आली असेल त्या जमिनीस अशा रीतीने देण्यात आलेली सूट ज्या प्रयोजनासाठी तिला सूट देण्यात आली असेल ते प्रयोजन खेरीजकरून इतर कोणत्याही प्रयोजनसाठी तिचा वापर करण्यात येत असेल तर चालू असण्याचे बंद होईल असा राज्य शासनाने निदेश देणे कायदेशीर असेल; आणि त्यानंतर उक्त जमीन या प्रकरणाच्या तरतुदींनुसार आकारणी देण्यास व त्याखेरीज, जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या सामान्य आदेशांना अधीन राहून निदेश देईल असा दंड दिला जाण्यास पात्र ठरेल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम११८
#MLRCAct1966Marathisection118 #section118MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.