महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २६४ :
जमीन महसुलाचे दायित्व :
१)जमिनीचा वरिष्ठ धारक किंवा तो गैरहजर असल्याचा जमिनीचा प्रत्यक्ष ताबा ज्या व्यक्तीकडे असेल ती व्यक्ती, धारण केलेल्या जमिनीवर देणे असलेल्या जमीन महसुलाबद्दल जातीने व मालमत्तेच्या रूपाने जबाबदार असेल.
२)जमिनीबद्दल देणे असलेल्या जमीन महसुलाची थकबाकी ही, तीत हितसंबंध असणाऱ्या व्यक्तींनी उक्त रकमेची मागणी करणाऱ्या व जमिनीवर किंवा जमिनीजवळ लावण्यात आलेल्या नोटीशीत याबाबत विनिर्दिष्ट करण्यात येईल त्या दिनांकास किंवा त्या दिनांकाच्या आत ती देण्यास कसूर केल्यास, त्या जमिनींवर व तिच्या प्रत्येक मार्गावर प्रमुख भार असेल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२६४
#MLRCAct1966Marathisection264 #section264MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.