महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २६५ :
राज्य शासनाच्या हक्क मागण्यांस प्राधान्य देणे :
१)या प्रकरणान्वये कोणत्याही जमिनीवर जमीन महसुलाच्या थकबाकींस, कोणत्याही अशा जमिनीच्या किंवा तिच्या वरिष्ठ धारकांच्या कोणत्याही इतर कर्जावर, मागणीवर किंवा कोणत्याही हक्क मागणीवर- मग ते गहाण, निकालपत्र- हुकूमनामा, अंमलबजावणी, जप्ती यांच्या संबंधातीत असो व अन्यथा कोणत्याही प्रकारचे असो- प्राधान्य देण्यात येईल.
२)जमीन महसुलाच्या थकबाकीव्यतिरिक्त परंतु या प्रकरणाच्या तरतुदीअन्वये महसूली मागणी म्हणून वसूल करता येण्याजोग्या कोणत्याही पैशासंबंधातील राज्य शासनाच्या हक्क मागणीला, कोणत्याही जमिनीवरील सर्व अप्रतिभूत मागण्यांवर प्राधान्य देण्यात येईल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२६५
#MLRCAct1966Marathisection265 #section265MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.