महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
शासकीय जमिनी व किनाऱ्यालगतचा प्रदेश :
कलम २९४ :
जमिनी व किनाऱ्यालगतचा प्रदेश यांवरील शासनाचा अधिकार :
मुंबई शहरातील भोगवटयात नसलेल्या सर्व जमिनी आणि भरतीच्या पाण्याच्या खूणेखालील किनाऱ्यालगतच्या प्रदेशाचा भोगवट्यात नसेलला प्रत्येक भाग कायदेशीररीत्या अस्तित्वात असलेले लोकांचे जाण्यायेण्याचे अधिकार व इतर सर्व अधिकार यांस नेहमीच अधीन राहून, राज्य शासनाची मालमत्ता आहे, असे समजण्यात येईल व ती राज्य शासनाची मालमत्ता असल्याचे याद्वारे घोषित करण्यात येत आहे.
शंकेचे निरसन व्हावे म्हणून याद्वारे असे स्पष्टपणे घोषित करण्यात येत आहे की, या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे, पूर्वीच्या कोणत्याही कायद्याद्वारे राज्य शासनाची मालमत्ता असल्याचे घोषित केलेल्या, भोगवटयात नसलेल्या जमिनीवरील राज्य शासनाच्या अधिकाराला बाधा येतो, असे समजले जाणार नाही.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२९४
#MLRCAct1966Marathisection294 #section294MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.