महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३०४ :
येणे असलेल्या रकमांच्या वसुलीसाठी इतर जिल्हाधिकाऱ्यांना सहाय्य करण्याचा मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार :
मुंबई शहरात राहणाऱ्या किंवा मालकीहक्काने मालमत्ता धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून येणे असलेली आणि जमीन महसुलाची थकबाकी म्हणून करता येईल अशी जी कोणतीही रक्कम राज्यातील कोणत्याही जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्याने किंवा सहाय्यक किंवा उप-जिल्हाधिकाऱ्याने किंवा तहसीलदाराने प्रमाणित केली असेल आणि ती तिच्याकडून येणे असल्याचे अशा प्रकारे त्यांनी प्रमाणित केले असेल अशी रक्कम या प्रकरणान्वये जमीन महसुलाची थकबाकी ज्या रीतीने वसूल करता येते त्याच रीतीने मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्याने वसूल करणे हे कायदेशीर असेल.
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.