महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३०७ :
व्यावृत्ती :
१)मुंबई शहर जमीन महसूल अधिनियम, १८७६ (१८७६ चा मुंबई २)यांच्या तरतुदींन्वये केलेली कोणतीही गोष्ट किंवा कार्यवाही (विहित केलेले सर्व नियम धरून) करण्यात आलेल्या नेमणूका, प्रदान करण्यात आलेले अधिकार, उक्त अधिनियमान्वये काढण्यात आलेले आदेश व प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचना आणि आता अमलात असलेले आणि या प्रकरणामध्ये हाताळण्यात आलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबींसंबंधातील तसे नियम असल्यास ते इतर सर्व नियम; मुंबई शहर भू-मापन अधिनियम, (१९१५ चा मुंबई ४ ) १९१५ अन्वये करण्यात आलेले कोणतेही भू-मापन किंवा उभारण्यात आलेल्या हद्दीच्या निशाण्या किंवा तयार करण्यात आलेले कोणतेही नकाशे व नोंदवह्या या प्रकरणान्वये आलेल्या हद्दीच्या निशाण्या किंवा तयार करण्यात आलेले कोणतेही नकाशे व नोंदवह्या या प्रकरणान्वये विहित करण्यात, प्रदाने करण्यात, काढण्यात, प्रसिध्द करण्यात, उभारण्यात आणि तयार करण्यात आल्याचे समजण्यात येईल.
२) उपरिनिर्दिष्ट अधिनियमांपैकी कोणत्याही अधिनियमान्वये सुरू करण्यात आलेले सर्व कामकाज हे, मुंबई शहरात हे प्रकरण अमलात आल्यावर, या संहितेअन्वये सुरू करण्यात आलेले कामकाज म्हणून समजण्यात येईल आणि यानंतर, ते या अधिनियमाच्या तरतुदींनुसार चालविण्यात येईल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३०७
#MLRCAct1966Marathisection307 #section307MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.