महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३३२ :
दुमाला गावांतील जमीनधारक :
कलम ३३१ च्या तरतुदींन्वये किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेलया कोणत्याही कायद्याअन्वये दुमाला गावात, भू-मापन जमाबंदी सुरू करण्यात आली असेल त्याबाबतीत, अशी भू-मापन जमाबंदी ज्या जमिनींना लागू असेल त्या सर्व जमिनींच्या धारकांना, बिन-दुमाला गावातील जमिनींच्या धारकांना या संहितेच्या तरतुदींन्वये जे हक्क आहेत आणि ते ज्या जबाबदाऱ्यांना पात्र आहेत तेच हक्क त्यांच्या भोगवटयात असलेल्या जमिनीबाबत लागू असतील आणि त्याच जबाबदाऱ्यांस ते पात्र असतील आणि बिन-दुमाला गाावातील जमिनींच्या धारकांबाबत या संहितेच्या सर्व तरतुदी, त्यास शक्य तेथवर लागू होतील.
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.