महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३३६ :
निरसन व व्यावृत्ती :
या संहितेच्या प्रारंभानंतर, पुढील कायदे याद्वारे निरसित करण्यात येत आहेत :-
क)१८७६ चा मुं. २ -मुंबई शहर जमीन महसूल अधिनियम, १८७६;
ख)१८७९ चा मुं. ५ - मुंबई जमीन महसूल संहिता, १८७९.
ग)१९१५ चा मुं. ४ - मुंबई शहर भू-मापन अधिनियम, १९१५;
घ)१९५८ चा मुं. ३१. - मुंबई महसूल न्यायाधिकरण अधिनियम, १९५७;
ड)१९१६ चा मु.प्रां. २. -मध्यप्रांत भूमि अन्यसंक्रामण अधिनियम, १९१६ ;
च)१९५५ चा मुं. प्रां. २. - मध्यप्रदेश जमीन महसूल अधिनियम, १९५४;
छ)१३१७ फसली चा है.८ - हैद्राबाद जमीन महसूल अधिनियम, १३१७ फ;
ज)१३५८ फसली चा है. ५८ - हैद्राबाद जमीन हक्कनोंदणीपत्रक विनियम, १३५८ फ :
परंतु, अशा रीतीने अधिनियम निरसित करण्यामुळे :-
क)अशा रीतीने निरसित करण्यात आलेल्या कोणत्याही कायद्याचा पूर्वीचा अंमल किंवा त्याअन्वये योग्य रीतीने केलेली किंवा करू न दिलेली कोणतीही गोष्ट, किंवा
ख)अशा रीतीने निरसित केलेल्या कोणत्याही कायद्याअन्वये संपादन केलेले, प्राप्त झालेले किंवा आलेले कोणतेही हक्क, विशेषाधिकार, बंधन किंवा दायित्व, किंवा
ग) अशा रीतीने निरसित करण्यात आलेल्या कोणत्याही कायद्याविरूध्द केलेल्या कोणत्याही अपराधासंबंधात आलेली कोणतीही शास्ती, जप्ती किंवा शिक्षा, किंवा
घ)उपरोक्त असा कोणताही हक्क, विशेषाधिकार, बंधन, दायित्व, शास्ती,जप्ती किंवा शिक्षा यासंबंधातील कोणतीही चौकशी, कार्यवाही, कायदेशीर कार्यवाही किंवा उपाययोजना, यास बाध येणार नाही.
आणि अशी कोणतीही चौकशी, कार्यवाही, कायदेशीर कार्यवाही किंवा उपाययोजना ही जणू काही ही संहिता संमत करण्यात आली नसल्याप्रमाणे दाखल करता येईल, चालू ठेवता येईल किंवा अमलात आणता येईल आणि अशी कोणतीही शास्ती, जप्ती किंवा शिक्षा करता येईल ;
परतुं, आणखी असे की, या संहितेच्या प्रारंभापूर्वी, आदिवासी जमातीतील व्यक्तीने, मध्यप्रांत भूमि अन्यसंक्रामण अधिनियम, १९१६ (१९१६ चा म. प्रा. २) अन्वये (जमीन) गहाण ठेऊन, पट्टयाने देऊन, किंवा अन्य रीतीने केलेल्या कोणत्याही तात्पुरत्या अन्यसंक्रामणाचे,जणू ही संहिता समंत करण्यात आली नसल्याप्रमाणे उक्त अधिनियमाच्या तरतुदींनुसार विनियमन करण्यात येईल ;
परंतु तसेच,पूर्वीच्या परंतुकास आणि या संहितेच्या कोणत्याही प्रकरणात केलेल्या कोणत्याही व्यावृत्तिविषयक तरतुदींना अधीन राहून, करण्यात आलेले कोणतेही नियम, अकारण्या, नियुक्त्या व बदल्या, काढण्यात आलेल्या अधिसूचना, आदेश, समन्स, नोटिसा, वॉरंटस् आणि उद्घोषणा, प्रदान करण्यात आलेले प्राधिकरण व अधिकार, मंजूर करण्यात आलेले नमुने आणि पट्टे, भू-मापनाच्या आणि सीमांची निश्चित करण्यात आलेली चिन्हे, तयार करण्यात किंवा कायम करण्यात आलेले अधिकाराभिलेख आणि इतर अभिलेख, संपादन केलेले अधिकार, पत्करलेली दायित्वे, आणि नेमून देण्यात आलेल्या वेळा आरि जागा, यांचा समावेश करून, अशा रीतीने निरसित करण्यात आलेल्या कोणत्याही कायद्याअन्वये केलेली कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही कृती ही, जेथवर ती या संहितेच्या तरतुदींशी विसंगत नसेल तेथवर, या संहितेच्या तत्सम तरतुदींन्वये करण्यात आलेली गोष्ट किंवा कृती आहे असे समजण्यात येईल; आणि या संहितेअन्वये केलेल्या कोणत्याही गोष्टीद्वारे किंवा कृतीद्वारे तिचे अधिक्रमण करण्यात आल्याशिवाय आणि अधिक्रमण करण्यात येईपर्यंत, अमलात असण्याचे चालू राहील.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३३६
#MLRCAct1966Marathisection336 #section336MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.