महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ७ :
जिल्हयातील महसूल अधिकारी :
१)राज्य शासन १.(प्रत्येक जिल्हयाकरिता (मुंबई शहर धरून) एक जिल्हाधिकारी नियुक्त करील व त्याच्याकडे त्या जिल्हयाच्या महसूली कारभाराचे काम असेल; आणि प्रत्येक तालुक्याकरिता एक तहसीलदार नियुक्त करील, आणि तो तालुक्याच्या स्थानिक महसुली कारभाराचे काम सोपवण्यात आलेला मुख्य अधिकारी असेल.
२)राज्य शासनाला, २.(प्रत्येक जिल्हयात (मुंबई शहर धरून) एक किंवा अधिक अपर जिल्हाधिकारी आणि त्यात इष्ट वाटतील इतके सहायक जिल्हाधिकारी आणि उप-जिल्हाधिकारी (सहायकांच्या नेमणुकीसंबंधीच्या आदेशात स्पष्ट केले असेल त्याप्रमाणे प्रथम द्वितीय अधिसंख्य इत्यादी सहायक यासारख्या पदनामांनी संबोधण्यात येईल). तालुक्यात एक किंवा अधिक नायब-तहसीलदार आणि त्यामध्ये एक किंवा अधिक अपर तहसीलदार किंवा नायब तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी त्यास इष्ट वाटतील (अशी पदनामे असलेले )अशा इतर व्यक्ती नियुक्त करता येतील.
३)राज्य शासनाच्या सर्वसाधारण आदेशास अधीन राहून, जिल्हाधिकाऱ्यांस जिल्हयाच्या एका किंवा अधिक उप-विभागांचा कारभार सहायक किंवा उप-जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविता येईल, किंवा त्याचा कारभार स्वत:कडे ठेवता येईल. अशा सहायक किंवा उप-जिल्हाधिकाऱ्यास, उप विभागीय अधिकारी या नावाने देखील संबोधता येईल.
४)जिल्हाधिकाऱ्यास प्रत्येक जिल्हयामध्ये मंडलाचे काम पाहण्यासाठी मंडल अधिकारी व मंडल निरीक्षक म्हणून, त्यास योग्य वाटतील इतक्या व्यक्ती नियुक्त करता येतील, आणि त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे साझ्याकरिता एक किंवा अधिक तलाठी आणि प्रत्येक गावाकरिता किंवा गावांच्या गटाकरिता एक किंवा अधिक कोतवाल किंवा इतर ग्रामसेवक नियुक्त करता येतील.
----------
१. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४७, कलम ५ द्वारे मुंबई शहाराकरिता आणि प्रत्येक जिल्हाकरिता या मजकुराऐवजी हा मजकूर दाखल केला.
२. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४७, कलम ५ अन्वये मुंबई शहराकरिता आणि प्रत्येक जिल्हयाकरिता या मजकुराऐवजी हा मजकूर दाखल केला.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम७
#MLRCAct1966Marathisection7 #section7MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.