महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
अनुसूची - घ :
(कलम २४२ पहा) :
जिल्हाधिकाऱ्याने कलम २४२ अन्वये काढावयाच्या अधिपत्राचा नमुना
(मुद्रा)
प्रति,
-------------- येथील दिवाणी तुरूगांचा प्रभारी अधिकारी.
ज्याअर्थी, क.ख. राहणार ------------ याने ------------------- तालुक्यातल्या -------------- गावातील विवक्षित जमिनीतून ------------------- येथील जमिनीतून किंवा किनाऱ्यालगतच्या जमिनीतून ड.च. यास (किंवा स्वत:स म्हणजे उक्त क.ख. यास ) काढून टाकण्यास ग.घ. यास हरकत घतली (किंवा अडथळा केला ) आहे ; आणि ज्याअर्थी, अशी हरकत किंवा अडथळा चालू राहण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून उक्त क.ख. यास कडेकोट बंदोबस्तात, ठेवणे जरूर आहे ; त्याअर्थी, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ याच्या कलम २४२ च्या तरतुदींन्वये, तुम्हास याद्वारे असे फर्माविण्यात येते की, तुम्ही उक्त क.ख. यास तुमच्या ताब्यातील तुरूंगात घ्यावे, आणि त्यास ------------ दिवस सुरक्षित ठिकाणी अटकेत ठेवण्यात यावे.
दिनांक ---------------- माहे ------------------ सन २०
(जिल्हाधिकाऱ्याची सही )
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६अनुसूची-घ
#MLRCAct1966MarathischeduleD #scheduleDMLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.