महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान अधिनियम २०१६
कलम १२ :
तक्रार निवारण यंत्रणा :
(१) राज्य शासन, या अधिनियमाच्या तरतुदी लागू असणाऱ्या हॉटेल, उपाहारगृह, मद्यपान कक्ष (बार रूम) आणि आस्थापना यांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सेवाशर्तींचे यथोचितरीत्या पालन करण्यात येत आहे, यांची सुनिश्चिती करण्यासाठी तक्रार निवारण समिती घटित करील. समिती, विहित करण्यात येईल अशा रीतीने अशा महिलांच्या तक्रारीचे निवारण करील.
(२) या समितीमध्ये, विहित करण्यात येईल त्याप्रमाणे गट अ अधिकाऱ्यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसेल अशा शासनाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
(३) समितीचे अधिकार आणि तिची कर्तव्ये तसेच तिची रीत ही विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असेल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.