रेल्वे अधिनियम, १९८९
कलम १३६ :
या प्रकरणातील बाबीसंबंधात नियम करण्याची शक्ती :
१) केंद्र शासनाला, या प्रकरणाची प्रयोजने पार पाडण्यासाठी अधिसूचनेद्वारे नियम करता येतील.
२) विशेषत: आणि पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेस बाध न आणता, अशा नियमांद्वारे खालील सर्व किंवा त्यापैकी काही बाबींसाठी नियम करता येतील, त्या अशा :-
क) कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्यांची नोकरी आवश्यकरीत्या मधून मधून खंडित होणारी किंवा कष्टप्रद असल्याचे घोषित करु शकेल अशी प्राधिकरणे;
ख) अशा कोणत्याही घोषणेविरुद्ध करावयाची अपिले आणि, असे कोणतेही अपील कोणत्या रीतीने व कोणत्या शर्तींच्या अधीनतेने दाखल करता येईल किंवा त्याची सुनावणी करता येईल ती रीत व त्या शर्ती;
ग) कलम १३० च्या खंड (ग) उपखंड (चार) व (पाच) अन्वये विनिर्दिष्ट करण्यात येतील असे कर्मचाऱ्यांचे प्रवर्ग;
घ) कलम १३२ च्या पोटकलम (४) किंवा कलम १३२ च्या पोटकलम (३) अन्वये ज्यांच्याकडून सूट देण्यात येऊ शकेल असे प्राधिकारी;
ङ) कलम (घ) मध्ये उल्लेखिलेल्या प्राधिकाऱ्यांकडून शक्तीचे प्रत्यायोजन;
च) कलम १३३ च्या पोटकलम (२) चा खंड (दोन) ज्यांना लागू होतो ते रेल्वे कर्मचारी आणि त्यांना द्यावयाच्या विश्रांतीचे कालावधी;
ुछ) रेल्वे श्रमिकांच्या पर्यवेक्षकांची नियुक्ती आणि त्यांची कार्ये.
#Railway #Act 1989 #Marathi Section 136
Section 136 Railway Act 1989 in Marathi.
INSTALL Android APP
For Full Access Purchase Paid MemberShip : Price -150 / Yearly.
संपूर्ण अॅक्सेस साठी पेड मेंबर व्हा.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.