हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१
( १९६१ चा अधिनियम क्रमांक २८) (२० मे १९६१ )
प्रस्तावना :
हुंडा देण्यास किंवा घेण्यास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम, भारतीय गणराज्याच्या बाराव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो : -
कलम १ :
संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
१) या अधिनियमास हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ असे म्हणता येईल.
२) जम्मू व काश्मीर राज्य खेरीज करून, संपूर्ण भारतभर त्याचा विस्तार आहे.
३) केंद्र सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील अशा दिनांकास तो अंमलात येईल.
#DowryProhibitionAct1961Marathi #DowryProhibitionActsection1
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.