हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१
कलम २ :
हुंडा याची व्याख्या :
या अधिनियमात हुंडा याचा अर्थ,-
क) विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षास, किंवा
ख) विवाहातील कोणत्याही पक्षाच्या मातापित्यांनी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने विवाहातील कोणत्याही पक्षास किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीस, (उक्त पक्षांच्या विवाहाच्या संबंधात) विवाहाच्या वेळी किंवा पूर्वी ( किंवा विवाहानंतर कोणत्याही वेळी ) प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा देण्याचा करार केलेली कोणतीही संपत्ती किंवा मूल्ववान रोखा असा आहे, पण ज्यांना मुस्लिम व्यक्तिगत कायदा ( शरीअत) लागू आहे त्या व्यक्तिंच्या बाबतीत, त्यात देन किंवा महरचा समावेश नाही.
स्पष्टीकरण दोन :
मूल्यवान रोखा या शब्दप्रयोगाला भारतीय दंड संहिते च्या कलम ३० मध्ये जो अर्थ दिलेला आहे, तोच आहे.
#DowryProhibitionAct1961Marathi #DowryProhibitionActsection2
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.